1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मे 2024 (00:24 IST)

भारताच्या 22 सदस्यीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी ज्योती सिंगची निवड

hockey
21 ते 29 मे कालावधीत होणाऱ्या युरोप दौऱ्यासाठी भारताच्या 22 सदस्यीय ज्युनिअर महिला संघाच्या कर्णधारपदी बचावपटू ज्योती सिंगची निवड करण्यात आली आहे, तर मिडफिल्डर साक्षी राणा उपकर्णधार असेल. भारतीय संघ बेल्जियम, जर्मनी आणि नेदरलँडचे दोन क्लब, ब्रेडेस हॉकी व्हेरीनिगिंग पुश आणि ऑरेंज रुड यांच्याविरुद्ध सहा सामने खेळणार आहे.

हॉकी इंडिया कडून जारी केलेल्या पत्रकात ज्योती म्हणाली, या संघात सगळे एकमेकांना ओळखतात.प्रत्येकजण कुशल आणि प्रतिभावान आहे.परदेशात अव्वल संघाच्या विरुद्ध खेळण्याचा चांगला अनुभव येईल. 
भारतीय संघ आपला पहिला सामना ब्रेडा हॉकी वैरिनीगिंग. पुश विरुद्ध 21 मे रोजी खेळणार आहे. आणि 22 मे रोजी बेल्जीयम विरुद्ध ब्रेडा येथे खेळणार आहे. नंतर 24 मे रोजी बेल्जीयम विरुद्ध खेळणार. नंतर जर्मनी विरुद्ध 26 मे रोजी ब्रेडा येथे खेळणार आणि 27 मे रोजी जर्मनी येथे खेळणार आहे. 29 मे रोजी ब्रेडा येथे ऑरेंज रुडविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे. 
 
संघ:
 
गोलरक्षक : आदिती माहेश्वरी, निधी
 
बचावपटू : ज्योती सिंग (कर्णधार), लालथंटलुआंगी, अंजली बर्वा, पूजा साहू, ममिता ओरम, नीरू कुल्लू.
 
मिडफिल्डर: के सोनिया देवी, रजनी केरकेता, प्रियांका यादव, के शिलेमा चानू, साक्षी राणा, अनिशा साहू, सुप्रिया कुजूर.
 
फॉरवर्ड: बिनिमा धन, हिना बानो, लालरिम्पुई, इशिका, संजना होरो, सोनम, कनिका सिवाच.
 
 
Edited By- Priya Dixit