गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 14 फेब्रुवारी 2024 (09:44 IST)

भारतीय महिला हॉकी संघाचा चीनकडून पराभव

hockey
भारतीय महिला हॉकी संघाची एफआयएच प्रो लीगमध्ये निराशाजनक कामगिरी कायम राहिली आणि सोमवारी येथे चीनकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला. संगीता कुमारीने सातव्या मिनिटाला मैदानी गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली मात्र संघाला त्याचा फायदा उठवता आला नाही.
 
14व्या मिनिटाला गु बिंगफेंगने पेनल्टी कॉर्नरवर केलेल्या गोलच्या जोरावर चीनने बरोबरी साधली. याच खेळाडूने 53 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रुपांतर करून संघाचा विजय निश्चित केला. याआधी 3 फेब्रुवारीला भुवनेश्वरमध्ये भारताचा चीनकडून याच फरकाने पराभव झाला होता. तसेच नेदरलँड्स (1-3) आणि ऑस्ट्रेलिया (0-3) विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, अमेरिकेचा 3-1 असा पराभव केला.
 
आता भारतीय संघाचा पुढील सामना बुधवारी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी नेदरलँडशी होणार आहे. 

Edited By- Priya Dixit