गुरूवार, 19 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 10 जुलै 2024 (09:27 IST)

धक्कादायक! या राज्यात 828 विद्यार्थी एचआयव्हीसंक्रमित आढळले 47 जणांचा मृत्यू

त्रिपुरातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. या राज्यातील एका शाळेत विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्हीची लागण लागल्याचे आढळून आले आहे. 

त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी(टीएसएसी एस)च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्रिपुरामध्ये 828 विद्यार्थी एचआयव्ही पॉसिटीव्ह आढळले असून 47 मुलांचा मृत्यू झाला आहे. शाळांचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

अधिकारी म्हणाले, आता पर्यंत 828 मुलांची एचआयव्ही पॉसिटीव्ह असल्याची नोंद केली आहे. 572 विद्यार्थी या आजाराने ग्रस्त असून 47 जणांचा मृत्यू झाला आहे. 

टीएसएसीएस च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पर्यंत एकूण 220 शाळा आणि 24 महाविद्यालयांची ओळख करण्यात आली असून इथले विद्यार्थी अमली पदार्थांचा सेवन करतात असे आढळून आले आहे. 

एचआयव्ही हा एक धोकादायक आणि संसर्गजन्य आजार आहे. सध्या या आजाराने त्रिपुरातील विद्यार्थ्यांना वेठीस धरले आहे. एचआयव्ही प्रकरणांमध्ये वाढ होण्यासाठी ड्रग्सच्या गैरवापराला जबाबदार धरून त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (टीएसएसीएस) ने म्हटले आहे की बहुतेक प्रकरणांमध्ये, श्रीमंत कुटुंबातील मुलांना एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळले आहे. या आकडेवारीत अशी कुटुंबेही आहेत जिथे आई-वडील दोघेही सरकारी नोकरीत आहेत  आहे मुलांच्या मागण्या पुरवण्यात व्यस्थ आहे. त्यांच्या मुलांना अमली पदार्थाचे व्यसन लागतात. पालकांना समजेल तो पर्यंत वेळ निघून जाते. 
 
Edited by - Priya Dixit