शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (18:22 IST)

धक्कादायक ! एटीएममधून समोर आलेला लाजिरवाणा व्हिडिओ, मुलींसमोर पुरुषाने लघुशंका करायला सुरुवात केली

सोशल मीडिया एक अशी जागा आहे जिथे अनेक प्रकारचे व्हिडिओ शेअर केले जातात. जेव्हापासून हा सोशल मीडिया आला आहे, तेव्हापासून कोणतीही गोष्ट ती पाहिल्यावर लगेचच व्हायरल होते. लोक अनेक वेळा मजेदार व्हिडिओ (सोशल व्हायरल व्हिडिओ) शेअर करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एटीएममधील सीसीटीव्हीमध्ये हा व्हिडिओ कैद झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती एटीएममध्येच लघवी करताना दिसत आहे .
हा 1 मिनिटाचा व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर आय लव्ह सिलुगरी नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला होता, जिथून तो हजारो लोकांनी पाहिलाआणि शेअर केला. हा व्हिडिओ एका शॉपिंग मॉलच्या एटीएममध्ये शूट केल्याचे सांगण्यात येत आहे. या एटीएममध्ये सुरुवातीला दोन मुली पैसे काढताना दिसल्या.एक माणूस आत फिरताना दिसला. मात्र काही वेळाने त्याने केलेल्या कृतीने सर्वांनाच धक्का बसला.
त्या व्यक्तीने एटीएममध्ये बाजूला ठेवलेले डस्टबिन बाहेर काढले. आणि त्यात लघवी करू लागला. सर्वात धक्कादायक म्हणजे या वेळी मुलीही तिथे उभ्या होत्या. व्हिडिओ पाहिल्यानंतर असे दिसते की मुली त्या व्यक्ती सोबतच होत्या. कारण त्या पण अगदी नॉर्मल होत्या. हा घृणास्पद व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओवर लोकांनी अनेक प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.
एका व्यक्तीने लिहिले की, हे अत्यंत लज्जास्पद आहे. त्याचवेळी एका युजर्स ने लिहिले आहे की, एटीएममध्ये बाथरूमची व्यवस्था असायला हवी. त्याच वेळी, काही लोकांनी याला व्हायरल करण्यासाठी बनवलेला जाणीवपूर्वक केलेला प्लॅन असल्याचे म्हटले आहे.