गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भारतात लहान आफ्रिका!

भारतात एक जागा अशी आहे जिथे गेल्यावर आपल्याला आफ्रिकेत आल्यासारखी जाणीव होऊ लागेल. गुजरातच्या 'गिर' जंगलात वास्तव्य करणारी ही आदिवासी टोळी आहे "सिद्धी", यांचे गाव 'जंबूर' म्हणून ओळखलं जातं. याला 'गुजरात चं आफ्रिका' असे ही म्हटले जाते. सिद्धी आदिवासी मूळ रूपात आफ्रिकेच्या 'बनतु' समुदायाशी जोडलेले आहेत.
 
भारतात या लोकांच्या येण्याची कहाणी मजेशीर आहे. इतिहासकारांच्या मते वर्तमानापासून सुमारे 750 वर्षांपूर्वी जुनागढचे तत्कालीन नवाब आफ्रिका गेले होते. ती ते एका आफ्रिकेच्या महिलेशी विवाह बंधनात अडकले होते. ती महिला आपल्यासोबत 100 गुलाम भारतात घेऊन आली. हळू-हळू जुनागढमध्ये यांचा समुदाय विकसित होऊ लागला. सिद्धी लोकांमधून काहींनी इस्लाम तर काही लोकांनी ख्रिस्ती धर्म मानायला सुरू केले. जेव्हाकी हिंदू धर्म पालन करणारे क्वचितच होते. गुजरातचे जुनागढ याचे गढ मानले गेले असले तरी हे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात ही पसरले. आकडेवारीनुसार भारतात सिद्धी समुदायाचे सुमारे 50 हजार लोकं राहतात.
 
या समुदायाचे लोकं लग्नाबद्दल कठोर असणे हे यांच्या जनसंख्या न वाढण्याचं प्रमुख कारण आहे. हे केवळ आपल्याच समुदायात विवाह करतात. आजही यांची सभ्यता-संस्कृतीमध्ये आफ्रिकेच्या रीती-भाती स्पष्ट दिसून येतात. गिरच्या जंगलात सिंह बघण्यासाठी येणारे पर्यटक तिथे या समुदायाच्या पारंपरिक नृत्याचा आनंद घेतात. यांना गुजरात टूरिझमसाठी तयार केलेले 'खुशबू गुजरात की' यातही दाखवण्यात आले आहे.