तिरुपती लाडूतील भेसळ प्रकरणाची SIT चौकशी करणार
आंध्र प्रदेश विशेष तपास पथक (SIT) ने सोमवारी सांगितले प्रसिद्ध तिरुपती लाडू बनवण्यासाठी प्राण्यांच्या चरबीच्या कथित वापराची कसून चौकशी करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एसआयटीचे प्रमुख सर्वेश त्रिपाठी म्हणाले की, टीम तामिळनाडूस्थित एआर डेअरीची चौकशी करणार आहे, ज्यांनी कथितरित्या भेसळयुक्त तूप पुरवले होते. तिरुपती पूर्व पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा यापूर्वीच एसआयटीकडे वर्ग करण्यात आला आहे, असे ही ते म्हणाले.
"एसआयटी अधिकारींनी या प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके तयार केली आहे. आम्ही भेसळयुक्त तुपासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करू आणि अहवाल सादर करण्यासाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा नाही," असे TDP ने सोमवारी त्रिपाठीच्या हवाल्याने सांगितले आहे.
Edited By- Dhanashri Naik