सोनिया गांधी यांनी नाकारले राम मंदिरचे निमंत्रण
काँग्रेस पक्षाने २२ जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण नाकारले आहे. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे सर्व बडे नेते अयोध्येला जाणार नाहीत. गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि काँग्रेस संसदीय पक्षाचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी रामजन्मभूमी ट्रस्टकडून निमंत्रण मिळाले होते.
राम मंदिर हा राजकीय प्रकल्प बनवला गेला
यासंदर्भात काँग्रेस पक्षाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, भाजप आणि आरएसएसने गेल्या काही वर्षांत अयोध्येतील राम मंदिराला राजकीय प्रकल्प बनवले आहे. केवळ निवडणुकीच्या फायद्यासाठी अर्ध्या बांधलेल्या मंदिराचे उद्घाटन केले जात आहे.
निवडणुकीच्या फायद्यासाठी अर्धनिर्मित मंदिराचे उद्घाटन
काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे की, करोडो भारतीय प्रभू रामाची पूजा करतात. धर्म ही नेहमीच माणसाची वैयक्तिक बाब राहिली आहे, पण भाजप आणि आरएसएसने राम मंदिराला राजकीय बाब बनवली आहे. यावरून अर्धवट बांधलेल्या मंदिराचे उद्घाटन केवळ निवडणुकीच्या फायद्यासाठी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आम्ही आदरपूर्वक आमंत्रण नाकारतो
निवेदनात पुढे म्हटले आहे की 2019 चा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करून आणि लोकांच्या विश्वासाचा आदर करत मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांनी या कार्यक्रमाचे भाजप आणि आरएसएसचे निमंत्रण आदरपूर्वक नाकारले.