गो-वंश हत्या रोखण्यासाठी आता गो-सेवा आयोग नेमणार
तीन वर्षापूर्वी सरकारने गो-वंश हत्येविरोधात कायदा पारित केला होता. याच कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आयोगाची स्थापना होणार असल्याचे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. या आयोग पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत असेल. अवैधरित्या पकडलेले गोवंशाचे संवर्धन आणि पकडलेल्या आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याचे कार्य या आयोगाच्या माध्यमातून होईल. तसेच गोमूत्र आणि शेणापासून तयार होणार्या बायो गॅस प्रकल्पांचा अभ्यास करून शासनाकडे अहवाल सुपूर्द करण्याचे कामसुद्धा आयोगाकडे असे.
आयोगाचे काम पुण्यातून चालणार असून या आयोगाला किती निधी द्यायचा हे अद्याप ठरलेले नाही. देशी गायींचे संवर्धन आणि दुग्धत्पादन वाढवण्याचा या आयोगाचा उद्देश असल्याचे पशुसंवर्धन मंत्री जानकर यांनी सांगितले. पुढील आठवड्यात आयोगाचे विधेयक कॅबिनेट बैठकीत सादर केले जाणार असून हिवाळी अधिवेशनात विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मांडले जाईल असे सांगितले आहे.