शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र नाहीत

national news
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यात येणार की नाही याबाबत चर्चा सुरू असतानाच मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी ही शक्यता धुडकावून लावली आहे. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि 11 राज्यातील विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यात येणार नाही असे रावत म्हणाले. औरंगाबादमध्ये निवडक संपादकांशी संवाध साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
 
यावेळी ते म्हणाले की, ‘देशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय कायदेमंडळ घेऊ शकते. यासाठी राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करावी लागेल. तसेच लोकप्रतिनिधी कायद्यामध्येही सुधारणा करावी लागणार आहे. या प्रक्रियेला 
 
किमान वर्षभराचा कालावधी लागू शकतो. म्हणूनच आगामी 2019 मध्ये होणारी लोकसभा आणि 11 राज्यांतील विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याची कुठलीही शक्यता नाही असे स्पष्ट केले आहे.