1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Students fall ill after adding detergent instead of salt to vegetables in Nalanda

धक्कादायक : भाजीमध्ये मिठाऐवजी कपडे धुण्याचा डिटर्जंट टाकले; शाळेतील जेवण केल्यानंतर १८ मुले आजारी पडली

बिहारमधील नालंदा येथे मुलांच्या माध्यान्ह भोजनात मिठाऐवजी कपडे धुण्याचा डिटर्जंट टाकण्यात आल्याने १८ मुले गंभीर आजारी पडली.
 
मात्र, नालंदाचे सिव्हिल सर्जन डॉ. जयप्रकाश सिंह यांनी सांगितले की, सर्व मुले सुरक्षित असून त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहे. माध्यान्ह भोजनात डिटर्जंट कसा आला, याचा तपास करण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
 
काय आहे संपूर्ण प्रकरण? 
बिहारमधील नालंदा येथील एका शाळेतून मुलांच्या आरोग्याबाबतच्या निष्काळजीपणाचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. शाळेच्या माध्यान्ह भोजनाचा भाग म्हणून मुलांना देण्यात येणाऱ्या सोयाबीनच्या भाजीमध्ये स्वयंपाक्यांनी मिठाऐवजी डिटर्जंट टाकला. हे जेवण खाल्ल्यानंतर अंदाजे १८ विद्यार्थी आजारी पडले. त्या सर्वांना तातडीने बिहार   रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
ही घटना नालंदा जिल्ह्यातील नूरसराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परासी माध्यमिक शाळेत घडली. माध्यान्ह भोजन कार्यक्रमातील हलगर्जीपणामुळे मुलांचे प्राण धोक्यात आले आहेत. मुलांची प्रकृती खालावल्यानंतर रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी जमली. मुलांची अवस्था पाहून काही काळासाठी घबराट पसरली. मात्र, डॉक्टरांचे म्हणणे आहे की बहुतेक मुले सुरक्षित असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. घटनेची माहिती मिळताच, नालंदाचे सिव्हिल सर्जन डॉ. जयप्रकाश सिंह यांच्यासह अनेक डॉक्टरांनी आजारी विद्यार्थ्यांच्या उपचारांची चौकशी करण्यासाठी मॉडेल हॉस्पिटलला भेट दिली. शाळेचे शिक्षक आशुतोष कुमार यांनी सांगितले की, माध्यान्ह भोजन दुसऱ्या शाळेत तयार करण्यात आले होते. त्या पदार्थातील सोयाबीनच्या भाजीमध्ये मीठ नव्हते. विद्यार्थ्यांनी मीठ मागितल्यावर, त्यांना चुकून डिटर्जंट देण्यात आल्याचा आरोप आहे. ही भाजी खाल्लेल्या अनेक विद्यार्थ्यांनी पोटदुखी आणि उलट्यांची तक्रार केली. प्रकृती खालावल्यानंतर, सुमारे १८ विद्यार्थ्यांना उपचारासाठी बिहार शरीफ मॉडेल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. शाळा व्यवस्थापन आणि प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
LIVE: डोमिनोज पिझ्झा आणि जय कृष्णा बेकरीचे अन्न परवाने निलंबित