1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सोमवारी रात्री सुपरमूनचे दर्शन होणार

super moon on Monday
येत्या सोमवारी दि. २१ जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे, तसेच त्यावेळी ब्लडमून, सुपरमून व वुल्फमून दर्शन असाही योग आला आहे. परंतु खग्रास चंद्रग्रहण आणि ब्लडमूनचे दर्शन भारतातून होणार नाही. मात्र त्या रात्री सुपरमूनचे दर्शन भारतातून होणार आहे. 
 
भारतातून खग्रास चंद्रग्रहण दिसणार नसले तरी ‘सुपरमून’ दर्शन होणार आहे. सोमवार दि २१ जानेवारी रोजी पौष पौर्णिमेला चंद्र सायंकाळी ६ वाजून ३९ मिनिटांनी पूर्वेला उगवेल आणि रात्रभर आकाशात दर्शन देऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी मावळेल. त्यारात्री ‘ सुपरमून ‘ म्हणजे मोठे व जास्त तेजस्वी चंद्रबिंब साध्या डोळ्यांनी पाहता येईल. भारतातून दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण १६ जुलै रोजी होणार आहे. तसेच सुपरमून दिसण्याचा योग पुन्हा याचवर्षी माघ पौर्णिमेच्या रात्री १९ फेब्रुवारी रोजी येणार आहे.