शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जून 2018 (11:59 IST)

चंद्र ग्रहण 2018: 104 वर्षांनंतर दिसेल दुर्लभ नजारा, या राशींवर पडेल प्रभाव

या वेळेस पुढच्या महिन्यात अर्थात जुलै महिन्यात एक दुर्लभ चंद्रग्रहण बनणार आहे. याचा चार राशींवर खास प्रभाव पडणार आहे. या खास दिवशी लोकांना काही खास गोष्टींकडे लक्ष्य ठेवायला पाहिजे. सांगायचे म्हणजे 104 वर्षांनंतर सात जुलै रोजी दुर्लभ चंद्रग्रहण लागणार आहे.
 
पंडितांप्रमाणे यंदा आषाढ पौर्णिमे रोजी 27 जुलैची रात्री खग्रास चंद्रग्रहण असेल. 27 व 28 जुलैला 3 तास 55 मिनिटांचे खग्रास चंद्रग्रहण राहील. संपूर्ण देशासोबत यमुनानगर आणि जवळपासच्या क्षेत्रात देखील याला बघता येईल. 104 वर्षांनंतर हा संयोग बनत आहे.
 
हे ग्रहण मेष, सिंह, वृश्चिक व मीन या चार राशींसाठी श्रेष्ठ आहे. तसेच मिथुन, तुला, मकर आणि कुंभ राशीसाठी हे चंद्रग्रहण नेष्ट आहे. या राशीच्या लोकांनी ग्रहण दरम्यान महादेव व मारुतीची आराधना करून ग्रहणाच्या प्रभावाला अनुकूल बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.