मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

हिंदू धर्मात भगवान विष्णूचे महत्त्व

hindu dharma
हिंदू धर्मात भगवान विष्णूला अनन्यसाधारण महत्व आहे. शांती, समृद्धी, सुख मिळवण्यासाठी विष्णूची पूजा केली जाते. विष्णू हे ब्रम्हा-विष्णू-महेश या त्रिदेवांपैकी एक आहेत. ब्रम्हाने ब्रम्हांडाची निर्मिती केल्यानंतर विष्णूवर ब्रम्हांडाचे रक्षण करण्याचे काम सोपवले. 
 
समुद्रात वास्तव्य करणारया विष्णूचे गरूड हे वाहन आहे. लक्ष्मी ही त्याची पत्नी. नारद मुनी त्यांचा मानसपुत्र. चार हात असणारया विष्णूच्या एका हातात शंख, दुसरया हातात सुदर्शन चक्र, तिसर्‍या हातात कमळ तर चौथ्या हातात गदा असते. 
 
असूरांचा नाश करण्यासाठी विष्णूने मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण हे अवतार घेतले. तर दहावा अवतार कलकीच्या रूपात असेल, असे मानले जाते.