रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

सायंकाळी पूजा करत असाल तर या सावधगिरी बाळगा!

पहाटे सूर्याच्या प्रथम किरणासोबत जास्तकरून घरांमध्ये पूजा अर्चना सुरू होऊन जाते. धूप-दीपच्या सुवासाने वातावरण सुगंधित होऊन जाते, शंख आणि घंटीच्या मधुर ध्वनीमुळे घरात सकारात्मकतेचा संचार होतो. पहाटे पूजा केल्याने संपूर्ण दिवस सुख-शांतीने जातो. विद्वानांचे असे मत आहे की सकाळी दैवीय शक्ती बलवान असतात आणि सायंकाळी आसुरी. देवाला प्रसन्न करण्यासाठी सकाळी पूजा पाठ अवश्य करायला पाहिजे. आसुरी शक्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी सूर्यास्तीनंतर देव उपासना करायला पाहिजे. म्हणून सकाळी व सायंकाळी केलेल्या पूजेचे आपले वेगळे महत्त्व असतात.   
 
आजच्या धावत्या जीवनशैलीत लोकांना सकाळी कामावर जायची घाई असल्यामुळे सकाळी पूजा करायला वेळ मिळत नाही. अशात ते संध्याकाळी पूजा करतात पण या वेळेस कोणती सावधगिरी बाळगायला पाहिजे हे जाणून घ्या... 
 
तुळशीचे पान आणि गंगाजल कधीही शिळे नसायला पाहिजे. त्याशिवाय कुठल्याही शिळ्या साहित्याचा वापर करू नये.  
 
सूर्यास्तीच्या वेळेस देवी-देवता विश्रामासाठी चालले जातात म्हणून शंख आणि घंट्या वाजवू नये.  
 
सूर्यास्तीनंतर वनस्पतीसोबत छेड छाड करू नये. म्हणून पूजेसाठी जे पान फूल हवे आहे ते सकाळीत तोडून ठेवावे.  
 
श्री हरी विष्णू आणि त्यांच्या कुठल्याही अवताराला तुळशी पत्र अर्पित केल्याशिवाय प्रसाद दाखवू नये. देव त्याला ग्रहण करत नाही.  
 
रात्री झोपण्याअगोदर मंदिरासमोर पडद्या टाकायला पाहिजे ज्याने देवांच्या विश्रामात बाधा उत्पन्न होणार नाही. मंदिराचे कपाट एकदा बंद केल्यानंतर सकाळीच उघडावे.