मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

म्हणून सकाळी 8 नंतर अंघोळ करू नये

अंघोळ केव्हा आणि कशी करावी यावर घरातील सुख शांती आणि समृद्धी वाढणे निर्भर करते. खास करून घरातील स्त्रीच्या हातात. मग ती स्त्री आईच्या रूपात असो, बायकोच्या रूपात किंवा बहिणीच्या स्वरूपात असो. घरातील वयोवृद्ध देखील नेहमी समजवतात की सूर्योदयाआधी स्नान करणे सर्वश्रेष्ठ असत. असे केल्याने धन, घरात सुख शांती आणि समाजात प्रतिष्ठा वाढते. सकाळच्या अंघोळीला धर्म शास्त्रात चार उपनाम देण्यात आले आहे. जुन्या काळात यासाठीच लोक सूर्योदयाआधी अंघोळ करत होते.  
 
1. मुनी स्नान- ही अंघोळ सकाळी सूर्योदयाआधी 4 ते 5च्या दरम्यान केली जाते. मुनी स्नान सर्वोत्तम आहे. या काळात स्नान करणार्‍या जातकांच्या घरात सुख शांती, समृद्धी, विद्या, बल, आरोग्य, चेतना सदैव कायम राहते.  
 
2. देव स्नान- ही स्नान पहाटे 5 ते 6 च्या दरम्यान केली जाते. देव स्नान उत्तम आहे. या दरम्यान स्नान करणार्‍या जातकांच्या जीवनात यश, कीर्ती, धन, वैभव, सुख-शांती, समाधान नेहमी कायम असतो.  
 
3. मानव स्नान- ही स्नान सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान केली जाते. या दरम्यान स्नान करणार्‍यांना कामात यश, उज्ज्वल भाग्य, चांगल्या कर्मांची समज तर मिळतेच, तसेच कुटुंबात देखील एकी कायम राहते.  
 
4. राक्षसी स्नान- ही स्नान सकाळी 8 वाजेनंतर केली जाते. कुठल्याही मनुष्याला आठ नंतर अंघोळ नाही केली पाहिजे. अशी स्नान हिंदू धर्मात निषेध आहे. या काळात स्नान करणार्‍या लोकांच्या घरात दरिद्रता, नुकसान, क्लेश, धन हानी, कष्टाळू जीवन जगावे लागते.