रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 25 जून 2018 (14:08 IST)

पूजेच्या सुपारीचे 10 असे उपाय, जे बदलून देतील तुमचे दिवस, नक्की वाचा ...

जेव्हा सुपारीची विधिवत पूजा केली जाती तेव्हा ती चमत्कारी होऊन जाते. जर तुम्ही या चमत्कारी सुपारीला नेहमी तुमच्याजवळ ठेवता तर जीवनात कधीही तुम्हाला पैशांची तंगी राहणार नाही. तर जाणून घेऊ सुपारीचे चमत्कारिक 10 उपाय...
 
1. पूजेच्या सुपारीवर जानवे लपेटून त्याची पूजा केली जाते तेव्हा ती अखंडित सुपारी गौरी गणेशाचा रूप घेऊन घेते. या सुपारीला तिजोरीत ठेवल्याने घरात लक्ष्मी स्थायी रूपेण निवास करू लागते आणि यामुळे  सौभाग्य येऊ लागत.  
  
2 . पूजेत वापरण्यात आलेल्या सुपारीला तिजोरीत ठेवणे देखील लाभदायक असत. सुपारीला दोर्‍यात लपेटून अक्षता, कुंकू लावून त्याची पूजा करावी. पूजा करून तिजोरीत ठेवण्यात आलेली सुपारी फारच लाभदायक असते.  
 
3. व्यापारात बढतीसाठी देखील ही सुपारी फारच कामी येते. असे मानले जाते की पिंपळाच्या झाडाची पूजा करून सुपारी आणि त्याच्यासोबत एक रुपयाचा नाणं ठेवावा. दुसर्‍या दिवशी त्या झाडाचे पान तोडून त्यावर सुपारी ठेवा आणि याला आपल्या तिजोरी ठेवा असे केल्याने व्यवसायात नक्कीच बढती मिळेल.  
 
4. विड्याच पान घेऊन त्यावर सिंदुरामध्ये तूप मिसळून स्वस्तिक बनवून त्या पानावर सुपारी ठेवून त्याची पूजा करायला पाहिजे. हा उपाय केल्याने सर्व कामांमध्ये यश नक्कीच मिळेल.  
 
5. जर तुमचे एखादे काम होता होता राहत असेल किंवा तुम्हाला प्रत्येक काम अपयश मिळत असेल तर जेव्हा ही ते काम करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा एक लवंग आणि सुपारी आपल्याजवळ ठेवा. कामाच्या वेळेस लवंग आपल्या तोंडात ठेवून त्याला चघळा. सुपारी घरी परतल्यावर परत गणपतीच्या फोटो समोर ठेवून द्या. याने तुमचे अडकलेले काम पूर्ण होण्यास मदत मिळेल.  
 
6. सुपारीला चांदीच्या डब्यात अबीर लावून एखाद्या पौर्णिमेला देवघरात ठेवली तर घरात शुभ कार्य लवकर होतील.  
 
7. हळद, कुंकू आणि तांदूळ घेऊन सुपारीवर दोरा लपेटून एखाद्या गुरुवारी विष्णू-लक्ष्मी मंदिरा ठेवून द्या. यामुळे अविवाहित कन्येच्या लग्नाचे योग लवकर बनतात. जेव्हा लग्न जुळत तेव्हा त्या सुपारीला लग्नापर्यंत घरातच ठेवावे. नंतर पाण्यात विसर्जित करून द्यावे.  
 
8. जर घरात एखादे शुभ कार्य असेल आणि ते निर्विघ्न पार पडू दे असे सुपारीला बोलून लाल कपड्यात बांधून लपवून ठेवावे. जेव्हा काम पूर्ण होऊन जाईल तेव्हा ही सुपारी एखाद्या गणेश मंदिरात जाऊन ठेवून द्यावं.  
 
9 . घरातून कोणी जेव्हा तीर्थ यात्रेवर जात असेल तर तो सकुशल परत येण्यापर्यंत तुळशीच्या कुंडीत सुपारीला दाबून ठेवावी. आल्यावर त्याला धुऊन एखाद्या मंदिरात ठेवून द्यावे.  
 
10. सुपारीला 7 वेळा आपल्यावरून उतरवून हवन कुंडात टाकल्याने प्रत्येक प्रकारच्या अडचणी दूर होण्यास मदत मिळेल.