बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 (17:22 IST)

न्यायालयांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती नको : सुप्रीम कोर्ट

suprime court
सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रगीत लावणं सक्तीचं करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. देशभरातील सर्व न्यायालयांमध्ये कामकाज सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. विशेष म्हणजे एका वकिलानेच ही याचिका दाखल केली होती. अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी याचिकेवर सुनावणीची गरज नसल्याचं सांगितले आहे.