शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 21 मे 2017 (20:40 IST)

स्वामी ओम बाबांना दिल्लीत मारहाण

‘बिग बॉस’च्या दहाव्या पर्वात सहभागी झालेले स्वामी ओम बाबांना दिल्लीत मारहाण झाली.  दिल्लीतील विकासनगरमध्ये नथुराम गोडसेच्या जयंत्तीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी स्वामी ओम बाबा यांना निमंत्रण होतं. वादग्रस्त व्यक्तीला गोडसेच्या जयंतीला का बोलावलं, असा सवाल करत उपस्थितांनी स्वामी ओम बाबांना जबर मारहाण केली. या मारहाणीनंतर स्वामी आपल्या गाडीतून जात असताना जमलेल्या लोकांनी गाडीला घेराव घातला. संतापलेल्या नागरिकांनी स्वामी ओम बाबांच्या गाडीचीही तोडफोड केली. या हल्ल्यात गाडीचा चालक जखमी झाला.