रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 31 जानेवारी 2024 (11:41 IST)

Tamilnadu :गर्भवती पत्नीला चालत्या बसमधून ढकलले, महिलेचा मृत्यू

death
तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यातून एका व्यक्तीने आपल्या गर्भवती पत्नीला चालत्या बसमधून ढकलून देण्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे. या महिलेचा मृत्यू झाला. वलरमथी असे या १९ वर्षीय तरुणीचे नाव आहे.या प्रकरणी आरोपी पती पांडियन ला पोलिसांनी अटक केली आहे. 
 
सदर घटना रविवारी तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यातील  आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने आपल्या गर्भवती पत्नीला चालत्या बसमधून ढकलले आहे. परिणामी तिचा मृत्यू झाला. वलरमथी आणि पांडियन असे  या जोडप्यांचे 8 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.वलरमथी 5 महिन्यांची गर्भवती होती.असून  आपल्या पतीसोबत उपनगरीय सरकारी बसने दिंडीगुल ते पोन्नमरावती असा प्रवास करत होती. 

प्रवासात दोघांमध्ये काही गोष्टींवरून वाद झाला आणि पांडियन ने दारूच्या नशेतच  बसच्या मागच्या दाराजवळ बसलेल्या पत्नी वलरमथीला लाथ मारली. वलरमथी बसच्या पायऱ्यांवरून खाली पडली. नंतर पती चालकाकडे गेला आणि त्याला पत्नी खाली पडल्याचे सांगितले नंतर बस तातडीनं थांबवली आणि याची सूचना पोलिसांना देण्यात आली नंतर पोलिसांनी वलरमथीचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले आणि आरोपी पतीला अटक केली. 
 
 Edited by - Priya Dixit