रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 12 जुलै 2022 (23:22 IST)

श्रीनगरच्या लालबाजारमध्ये पोलीस पथकावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद, दोन जखमी

jawan
काश्मीरचे श्रीनगर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, लाल बाजारच्या सर्वात वर्दळीच्या भागात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या नाका पार्टीवर हल्ला केला.या हल्ल्यात एक एएसआय शहीद झाला.तर अन्य दोघे जखमी झाले आहेत.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दुसरीकडे, लष्कर आणि पोलिसांच्या पथकाने परिसराची नाकेबंदी करताना दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे.
 
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या लाल बाजार परिसरात दहशतवादी हल्ला झाला.हा परिसर अत्यंत गजबजलेला मानला जातो.बाजारपेठ परिसरात पोलिसांच्या नाका पार्टीवर अगोदरच घुसलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला.या हल्ल्यात एएसआय मुश्ताक अहमद गंभीर जखमी झाले.ज्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या हल्ल्यात अन्य दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की लाल बाजार येथील जीडी गोएंका शाळेबाहेर दहशतवाद्यांनी नाका पार्टीवर गोळीबार केला.पोलिसांनी हल्ले हाणून पाडले मात्र हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.दुसरीकडे, दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांच्या पथकाने परिसराची नाकेबंदी केली आहे.दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.