शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 एप्रिल 2022 (12:38 IST)

जम्मू कश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलांवर दहशतवादी हल्ला,सुदैवाने जीवित हानी नाही

दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात मंगळवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर दहशतवादी हल्ला केला. शोपियन जिल्ह्यातील हरपोरा बटागुंड भागात अतिरेक्यांनी अल्पसंख्याक रक्षकावर गोळीबार केला. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही.
 
वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी अल्पसंख्याक रक्षकांवर दूरवरून गोळीबार केला, या गोळीबाराला सुरक्षारक्षकांनी लगेच प्रत्युत्तर दिले. हे दहशतवादी पळून गेले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे.
 
यापूर्वी सोमवारी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी गैर-मुस्लिम पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी सांगितले की, काकापोरा रेल्वे स्थानकाच्या बाहेर चहा प्यायला आलेले दोन रेल्वे संरक्षण दल (RPF) कर्मचारी, उपनिरीक्षक देवराज आणि हेड कॉन्स्टेबल सुरिंदर सिंग यांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी गोळीबार करत हल्ला केला होता.
 
हल्ल्यानंतर लगेचच सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव घालून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली. या महिन्यातील १८ दिवसांत दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दल, नागरिक आणि गैर-काश्मीरी मजुरांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची ही सातवी घटना होती.