गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (16:08 IST)

काही आठवड्यांपासून बेपत्ता एका कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतदेह 8 फूट खोल खड्ड्यात सापडले

एका धक्कादायक घटनेत गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या एका कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतदेह मंगळवारी संध्याकाळी मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील शेतात सापडले. या पाच जणांना गळा आवळून जिवे मारले गेले आणि त्यांना आधीच खणलेल्या 8 ते 10 फूट खोल खड्ड्यात पुरण्यात आले. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता (45), तिच्या दोन मुली (21 वर्षाची रुपाली आणि 14 वर्षीय दिव्या) आणि या एका मुलीचे दोन मुलं 13 मे पासून देवास येथील घरातून बेपत्ता झाले होते. पोलिसांनी सांगितले की, या घटनेमागे मकान मालक ज्याचं यापैकी एका पीडिताशी रिलेशन होतं आणि जवळपास डझन साथीदार आहेत. मुख्य आरोपी सुरेंद्र आणि इतर चार संशयितांना अटक करण्यात आली आहे, तर इतर सात जणांचा शोध सुरू आहे.
 
जेव्हा पोलिसांनी आठ फूट खोल खड्डा खणला तेव्हा त्यांना वेगवेगळ्या ढिगार्‍यातून पाच कुजलेले मृतदेह सापडले, त्यांच्यापैकी कोणावरही कपडे नव्हते. आरोपींनी कपड्यांना मिसळुन जाळले होते. इतकेच नव्हे तर मृतदेहांना मीठ आणि यूरियाने झाकले गेले जेणेकरुन लवकरच त्यांचा नाश होईल. 
 
देवास पोलिस अधिकारी शिव दयाल सिंह म्हणाले, सुरेंद्र चौहानसह सहा जणांना अटक केली आहे. चौहानने हत्येची योजना आखली व अंमलात आणली. इतर पाच जणांनी त्याला खड्डा उघडण्यास मदत केली जेणेकरून मृतदेह पुरता येईल. 
 
कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांच्या हरवण्याची तक्रार नोंदवली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मारेकर्‍यांनी या महिलेच्या मोठ्या मुलीच्या आयडीने सोशल मीडियावर मेसेज पाठवून या प्रकरणात पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या संदेशात दावा केला गेला होता की रुपालीने तिच्या इच्छेनुसार लग्न केले आहे. लहान बहीण, चुलत भाऊ व आई दोघेही त्याच्याबरोबर आहेत आणि सुरक्षित आहेत.