शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (15:27 IST)

राज्यात घरोघऱी लसीकरण मोहिम सुरू करणार

महाराष्ट्रात लवकरच घरोघऱी लसीकरण मोहिम सुरू करणार असल्याची माहिती ठाकरे सरकारने मुंबई हायकोर्टात दिली आहे. घरोघरी लसीकरण करण्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्य सरकारने पुण्यातून प्रायोगित तत्वावर या माहिमेची सुरुवात करणार असल्याचे सांगितले आहे. तसंच राज्य सरकारने हे देखील सांगितले की, ते लसीकरणासाठी केंद्र सरकारवर अवलंबून राहणार नाही.
 
घरोघरी लसीकरणाबाबत राज्य सरकारचा पाचकलमी कार्यक्रम तयार असताना केंद्र सरकराच्या मंजुरीची गरज काय, असा प्रश्न उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला विचारला होता. त्यानंतर न्यायालयाने केरळ, बिहार, झारखंडने केंद्रची परवानगी घेतली होती का? अशी विचारणा राज्य सरकारला करत, त्यांच्य़ा अंतिम टप्प्यात माघार घेण्याच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी नव्याने भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने आज म्हणजेच 30 जून ला मुंबई हायकोर्टात आपण केंद्राच्या परवानगीची वाट पाहणार नसल्याचे स्पष्ट करत, घरोघरी लसीकरण मोहिम सुरु करणार असल्याचे सांगितले आहे.