मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जून 2021 (07:41 IST)

राज्याचा रिकव्हरी रेट 96 टक्क्यांवर, 6,727 नवे रुग्ण

महाराष्ट्रात सोमवारी मागील दोन महिन्यांतील निच्चांकी कोरोना रुग्ण वाढ नोंदवली आहे. सोमवारी राज्यात 6 हजार 727 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 10 हजार 812 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 60 लाख 43 हजार 548 एवढी झाली आहे. त्यापैकी 58 लाख 925 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 17 हजार 874 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
 
महाराष्ट्रात आजवर 1 लाख 21 हजार 573 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. सोमवारी 101 कोरोना रुग्ण दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.02 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आतापर्यंत 4 कोटी 12 लाख 08 हजार 1361 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 15 हजार 839 लोक होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 245 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.