सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 19 डिसेंबर 2021 (17:30 IST)

नववधू प्रियकराच्या मदतीने 'हे 'धक्कादायक काम करून पसार

उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे मिरवणूक निघण्यापूर्वीच नववधू रोख रक्कम आणि दागिने घेऊन पसार झाल्याची धक्कादायक बातमी मिळाली आहे. नववधूने कुटुंबातील सदस्यांना चहातून गुंगीचे औषध देऊन तिच्या प्रियकरासह पसार झाली. 
चहा प्यायल्याने कुटुंबातील 6 जण बेशुद्ध झाले. मुलीच्या इच्छेविरुद्ध हे लग्न होत असल्याचे वृत्त आहे. या मुळे मुलगी रागावली होती.तिने आपल्या प्रियकरासह हे काम केले आणि  दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाली. पोलिसांनी प्रकरण  नोंदवून तिला शोध घेण्याचे काम सुरु केले आहे.