बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 19 डिसेंबर 2021 (11:12 IST)

श्रीनगरच्या हरवान मध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार

जम्मू काश्मीर येथे श्रीनगरमधील हरवान भागात रविवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका अज्ञात दहशतवाद्याचा खात्मा केला. 
काश्मीर पोलिसांनी ट्विट केले की, गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरु केली आहे. चकमकीत हा दहशवादी मारला गेल्याची पुष्टी करताना त्यांनी सांगितले की, हा दहशतवादी कोणत्या संगठनेशी संबंधित होता हे अद्याप कळू शकले नाही. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे चकमक सुरु झाली आणि काही वेळातच सुरक्षा दलांनी दहशवाद्याला ठार केले. संपूर्ण परिसरात सतर्कता ठेवण्यात येत आहे. 

जम्मू काश्मीर मध्ये अलीकडील एका महिन्यात झालेल्या सुमारे 3 डझन चकमकीत सुरक्षा दलांनी 16 दिवसांत 12 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.