रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 डिसेंबर 2021 (12:45 IST)

Road Accident : कंटेनर ऑटोवर आदळून उलटला चार ठार

दिल्लीत सकाळी झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा नृत्यू झाला . मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे आयजीआय स्टेडियमजवळ कंटेनर ऑटोवर उलटला, या अपघातात ऑटो चालकासह चार जणांचा मृत्यू झाला. घटनेनंतर कंटेनरचा चालक फरार आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आणि चालकाचा शोध सुरू केला. त्याचबरोबर मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. 
ऑटो कापून मृतदेह काढले
पोलिसांना सांगितले की, संध्याकाळी 6:50 च्या सुमारास त्यांचे एक पेट्रोलिंग वाहनाला एक मोठा ट्रक ट्राला कंटेनर ऑटोवर पडल्याची माहिती मिळाली या अपघातात चार जण दाबले गेले. कॅट रुग्णवाहिकेच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने ऑटोला कापून चार तरुणांना बाहेर काढले आणि एलएनजेपी रुग्णालयात पाठवले. रुग्णालयात नेल्यावर चौघांना मृत घोषित केले. ट्रकचा कंटेनर 35 टनाचा असल्याने तो रस्त्याच्या कडेपासून बाजूला करता येणं शक्य नहव्ते . त्यामुळे वाहतूक कोंडी झाली .
मृतांपैकी फक्त दोन जणांची ओळख पटली आहे तर इतर दोघांची ओळख पटलेली नाही. या अपघातात ऑटो चालक सुरेंदर कुमार यादव रा.शास्त्री आणि चालकाचा पुतण्या जय किशोर यांचा मृत्यू झाला आहे.
ट्रक कंटेनर मालक जितेंद्र यांनी सांगितले की, सोनीपत येथून तुघलकाबादपर्यंत जाणाऱ्या ट्रककंटेनर मध्ये तांदूळ भरला होता. ट्रककंटेनरचा चालक व मदतनीस फरार आहेत. याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तर वाहतूक व्यवस्था आता सामान्य झाली आहे.