मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 डिसेंबर 2021 (11:42 IST)

असे काय घडले, की नवरदेवाची लग्न मंडपातच धुलाई झाली

दिल्लीच्या जवळ गाझियाबादातील साहिबाबाद परिसरात एका नवरदेवाला हट्ट करणे महागात पडले . त्या हट्टापायी नवरदेवाची भर लग्न मंडपात लाथा बुक्क्याने धुलाई केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . या व्हिडिओमध्ये मुलीच्या घरातील सदस्य नवरदेवाला ओढत मारहाण करत आहे. तर नवरदेवाकडील नातेवाईक त्याला वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे . 
प्रकरण काय आहे -
लग्न समारंभात लग्नाच्या आधी हा नवरदेव हुंड्याची मागणी करू लागला .लग्नाच्या आधी मुलीच्या घरच्या लोकांनी मुलाला तीन लाख रुपये रोख आणि एक लाख रुपयांची हिऱ्याची अंगठी दिली होती. मात्र नवरदेवाच्या कुटुंबियांना आणखी हुंडा पाहिजे होता. आणि नवरदेव हुंड्यासाठी अडून बसला होता. मुलीच्या कुटुंबीयांनी विनंती करून देखील मुलाकडील काहीच ऐकत न्हवते .
नंतर मुलीकडील लोकांनी नवरदेवाची चांगलीच धुलाई केली. त्याला लाथा बुक्क्याने चोपले . नंतर मुलीच्या कुटुंबियांना समजले की मुलाचे नाव मुज्जमील असून तो आग्राला राहतो आणि त्याचे आधीच 2-3 लग्न झाले आहेत.