बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 मार्च 2023 (19:05 IST)

अपघातात अर्धी कापली गेली कार

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघर मधील धानिवरी येथे  प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या झालेल्या अपघाती मृत्यू ठिकाणाहून काही अंतरावर येथे फॉर्च्युनर कारचा भीषण अपघात झाला. 
 
चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ही फॉर्च्यूनर थेट पुढे चाललेल्या कंटेनर वर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात फॉर्च्युनर गाडी अर्धी कापली गेली. तसेच या भरधाव कारने अपघातानंतर तीन ते चार पलटी देखील खाल्ल्या.  मात्र, या कार मधील कार चालकासह सहप्रवाशी सुखरुप बचावले आहेत. ड्रायव्हरसह सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावले असल्याने या कार मधील कोणालाही किरकोळ दुखापत सुद्धा झाली नाही.  विमल मैतालिया हे आपल्या कारचालक आणि मुलांसह मुंबईकडे जात असताना धानीवरी येथे हा भीषण अपघात घडला. मात्र, कार मधील सर्वांचा दैव बलवत्तर म्हणून कोणालाही दुखापत झाली नाही.
 
वाहतुकीचे नियम पाळल्याने जीव वाचला
वाहतुकीचे नियम पाळण्याचे वारंवार आवाहन पोलीस प्रशासन, आरटीओ आणि शासनाकडून करण्यात येते. नियम मोडणाऱ्यांना दंडही लावला जातो. मात्र, हेच नियम जर काटेकोरपणे पाळले तर आपला जीव आपण स्वतःही वाचू शकतो हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.