गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: अयोध्या , सोमवार, 21 डिसेंबर 2020 (12:21 IST)

अयोध्येतील नव्या मशिदीचे डिझाईन झाले प्रसिध्द

बाबरी मशीद-राम जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पडदा पडला. सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्याचे आदेश दिले होते तर बाबरी मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्याचे आदेश दिले होते. राम मंदिराच्या कामाच्या काही महिन्यांपूर्वी बाबरी मशिदीच्या कामालाही लवकरच सुरूवात होणार आहे. पाच एकर जागेवर उभारण्यात येणार्याच शिदीचे डिझाईनही प्रसिद्ध करण्यात आले आहे.
 
इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्टने अयोध्येतील धन्नीपूर गावात उभारण्यात येणार मशिदीचे संकल्पचित्र प्रसिद्ध केले. अयोध्येपासून 30 किमी अंतरावर असलेल्या या गावात मशिदीसाठी पाच एकर जागा देण्यात आलेली आहे. मशिदीचे भव्यदिव्य संकल्पचित्र फाउंडेशनकडून प्रसिद्ध करण्यात आले असून, मशिदीबरोबरच एक रुग्णालयही उभारण्यात येणार आहे.
 
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या आर्किटेक्ट विभागातील(स्थापत्य कला) प्रा. एस. ए. अख्तर यांनी मशिदीचे संकल्पचित्र तयार केले आहे. तयार करण्यात आलेल्या आरेखनाला संबंधित विभागाकडून वेळेत आवश्यक परवानग्या मिळाल्या तर 26 जानेवारीपासून काम सुरू होऊ शकते. मात्र, जर वेळेत परवानग्या मिळाल्या नाही तर 26 जानेवारी ऐवजी दुसरी तारीख ठरवली जाईल, अशी माहिती ट्रस्टने दिली आहे.