1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 6 एप्रिल 2022 (22:26 IST)

काँग्रेस मुख्यालयात एसी बिघडल्याने आग लागली, अग्निशमन दलाने त्यावर नियंत्रण मिळवले

दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात आज संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. एसीमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. कॅनॉट प्लेस अग्निशमन केंद्राचे प्रेम लाल म्हणाले की, आग पूर्णपणे नियंत्रणात आली आहे.सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.