शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (10:57 IST)

बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातापूर्वीचा पहिला व्हिडिओ व्हायरल

भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचं निधन झालं आहे. तामिळनाडूमध्ये झालेल्या एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. भारतीय हवाई दलानं ट्वीट करून यासंबंधीची माहिती दिली आहे.
 
या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 लोक होते, ज्यांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बिपीन रावत यांच्या विमानाला तामिळनाडूमधील कुन्नूर इथं अपघात झाला होता.
 
आता हे हेलिकॉप्टर कोसळण्याआधी नेमकं काय घडलं हे दाखवणारा पहिला व्हिडिओ समोर आला असून यात हेलिकॉप्टर हवेत असतानाच समोर असलेल्या दाट धुक्यांमध्ये गेल्याचं पाहायला मिळतं आहे. यानंतर काहीच क्षणांत हेलिकॉप्टरच्या इंजिनचा आवाज बंद होत असताना कळून येत असल्याचे म्हटलं जातं आहे. या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
कुन्नूर येथून बिपीन रावत हे दिल्लीला जाणार होते. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असं वायूसेनेने स्पष्ट केलं आहे.