हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपिन रावत यांच्यासह या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला, पहा संपूर्ण यादी

helicopter crash
Last Modified बुधवार, 8 डिसेंबर 2021 (23:30 IST)
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह अन्य 11 अधिकारी आणि जवान बुधवारी तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात ठार झाले. जनरल रावत यांच्यासमवेत ब्रिगेडियर दर्जाचा अधिकारी आयएएफच्या Mi-17V5 हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या सहाय्यकांसह होता. या दुर्घटनेतून फक्त ग्रुप कॅप्टन वरुण सिंग बचावले, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हवाई दलाने सांगितले की, Mi-17V5 हेलिकॉप्टरमध्ये CDS आणि इतर नऊ प्रवासी आणि चार क्रू सदस्य होते.बिपिन रावत आणि मधुलिका रावत यांच्याशिवाय ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, विंग कमांडर पीएस चौहान, स्क्वाड्रन लीडर के. सिंग, जेडब्ल्यूओ. दास, जेडब्ल्यूओ प्रदीप ए, नाईक गुरसेवक सिंग, नाईक जितेंद्र कुमार, लान्स नाईक विवेक कुमार, लान्स नाईक साई तेजा आणि हवालदार सतपाल यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातून फक्त ग्रुप कॅप्टन वरुण सिंग बचावला. त्याच्यावर वेलिंग्टन येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
हवाई दलाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, "खूप दु:खाने याची पुष्टी केली जाते की जनरल बिपिन रावत, श्रीमती मधुलिका रावत आणि अन्य 11 जणांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे." रावत डिफेंस सर्विसेज स्टॉफ महाविद्यालयाच्या भेटीसाठी जात होते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करायचे होते."
दुपारी दोनच्या सुमारास कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर कोसळले. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे हवाई दलाने सांगितले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल रावत सशस्त्र दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि त्यांची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी तीन सेवांच्या महत्त्वाकांक्षी आधुनिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख करत होते.

जनरल रावत 17 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत भारतीय लष्कराचे प्रमुख होते. 31 डिसेंबर 2019 रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जनरल रावत, त्यांच्या पत्नी आणि अन्य 11 जणांच्या निधनाबद्दल लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला. लष्कराने ट्विट केले की, “जनरल बिपिन रावत यांचे दिग्गज आणि प्रेरणादायी नेतृत्व नेहमी आमच्या आठवणींमध्ये राहील. त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल भारतीय लष्कर सदैव ऋणी राहील.यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

लालू यादवांच्या अडचणीत पुन्हा वाढ, सीबीआयने गुन्हा नोंदवला, ...

लालू यादवांच्या अडचणीत पुन्हा वाढ, सीबीआयने गुन्हा नोंदवला, 15 ठिकाणी छापे
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत ...

रुग्णाच्या किडनीतून 206 स्टोन काढले

रुग्णाच्या किडनीतून 206 स्टोन काढले
हैदराबादमधील अवेअर ग्लेनेगल्स ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाच्या मूत्रपिंडातून ...

Delhi Ration Doorstep Delivery:दिल्ली उच्च न्यायालयाने आप ...

Delhi Ration Doorstep Delivery:दिल्ली उच्च न्यायालयाने आप सरकारची 'मुख्यमंत्री घरोघरी रेशन योजना' रद्द केली
दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल सरकारला मोठा दणका दिला आहे. डीलर युनियनच्या ...

नवी दिल्ली: बवाना येथील एका थिनरच्या कारखान्याला भीषण आग ...

नवी दिल्ली: बवाना येथील एका थिनरच्या कारखान्याला भीषण आग लागली
दिल्लीतील आगीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. दिल्लीतील बवाना भागातील एका पातळ ...

जाणून घ्या कोणते प्रकरण आहे ज्यात नवज्योत सिंग सिद्धू यांना ...

जाणून घ्या कोणते प्रकरण आहे ज्यात नवज्योत सिंग सिद्धू यांना तुरुंगवास भोगावा लागला
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना देशाच्या सर्वोच्च ...