बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (16:06 IST)

लष्करी अधिकाऱ्यांना हेलिकॅाप्टर आणि विमान प्रवासात 'हे' 7 नियम पाळावेच लागतात

तामिळनाडूच्या कुन्नुर या ठिकाणी लष्कराच्या हेलकॉप्टरला अपघात झाला, या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत हे होते, असं भारतीय वायुसेनेनी सांगितलं आहे.
या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील होत्या असं सांगितलं जात आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरुन 4 मृतदेह काढले असून 3 जखमींना बाहेर काढण्यात आलं आहे.
बिपीन रावत ज्या Mi-17V5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते ते भारतीय हवाई दलाच्या सेवेतलं रशियन बनावटीचं हेलिकॉप्टर आहे. प्रामुख्यानं लष्करी वाहतुकीसाठी Mi-17V5 हेलिकॉप्टर्सचा वापर केला जातो.
घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असं वायूसेनेने स्पष्ट केलं आहे.
भारतातल्या अति-महत्त्वाच्या व्यक्तींसाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने 2014 मध्ये 'एअर सेफ्टी' सर्क्युरल जारी केलं होत.
 
VIP मंडळींच्या लहान विमानं आणि हेलिकॅाप्टर प्रवासासाठी या सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. खासकरून निवडणूक काळात नेते आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींकडून होलिकॅाप्टरचा वापर होत असल्याने या उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
 
VIP's च्या हवाई प्रवासाच्या सुरक्षेचे नियम
 
पायलटचे लायसेंन्स सर्टिफाईड असावेत.
हेलिपॅडचं सिलेक्शन योग्य असावं.
हेलिकॅाप्टर लॅंड होण्यासाठी योग्य जागा असावी.
विमानाच्या क्रू ने प्रवासाची योग्य माहिती ठेवावी. झाडं, हाय टेन्शन वायर्स आणि हेलिपॅडचे को-ऑर्डिनेट योग्य तपासून घ्यावेत.
विमान प्रवासाचा रूट आणि किती लोक असणार आहेत याची माहिती जवळच्या एअर टॅृफिक सेंटर (ATC) ला देण्यात यावी.
विमान प्रवासापूर्वी हवामानाची पूर्व माहिती घ्यावी.
प्री- फ्लाईट मेडिकल तपासणी अनिवार्य आहे.
विमानात प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी किंवा माल नसावा याची खबरदारी घ्यावी.
लॅडिंग आणि टेक-ऑफ करताना सुरक्षा उपाययोजना पाळाव्यात.
लष्कराचे अधिकारी हेलिकॅाप्टरमधून प्रवास करत असतील तर दोन इंजीनचं हेलिकॅाप्टर असणं आवश्यक.
लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हेलिकॉप्टर प्रवासाचे नियम
 
दोन पेक्षा जास्त जनरल रॅंकचे अधिकारी एकत्र प्रवास करू शकत नाहीत.
दोन इंजिन असलेलं हेलिकॅाप्टर प्रवासासाठी आवश्यक.
सुरक्षा तपासणी अत्यंत महत्त्वाची.
ठराविक आणि ठरलेल्या वेळीच प्रवासाची परवानगी. ही वेळ बदलली जात नाही.
हवामान आणि महिन्या प्रमाणे प्रवास निश्चित असतो.
ज्या ठिकाणी उतरणार किंवा तिथून उड्डाण घेणार त्या ठिकाणी इंधनाचा यांचा पुरेसा असावा.
आपात्कालीन परिस्थितीत ambulance आणि वैद्यकीय मदतीची तयारी असावी.
एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाई प्रवासावेळी दोन्ही पायलटचं प्रशिक्षण नेमकं काय आणि कसं झालं आहे, संबंधित विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये टेक्निकल सर्व गोष्टी नेमक्या काय आहेत याची माहिती आधी घेतली जाते. शिवाय विमानात वजन किती असावं याबाबत स्पष्ट नियम असतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना रात्री प्रवास करायचा नाही असा नियम आहे. शिवाय दुर्घटना घडू नयेत म्हणून घेण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजनांची माहिती प्रवाशांना देण्यात आलेली असते.