सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (14:51 IST)

अपघातग्रस्त हेलिकॉप्टर MI-17 V5 मध्ये कोण - कोण होतं

नवी दिल्ली- हवाई दलाच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टर MI-17 V5 मध्ये एकूण 9 जण होते. सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण 9 लोक प्रवास करत होते.
 
रावत दाम्पत्याशिवाय ब्रिगेडियर एलएस लिड्‍डर, ले. कर्नल हरजिंदर सिंग, हवालदार सतपाल, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लांसनायक विवेक कुमार आणि लांसनायक बी साई तेजा.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बचावकार्य सातत्याने सुरू आहे. ज्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे त्यांच्यासोबत जनरल रावत यांचाही समावेश आहे. रावत यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुलूर विमानतळावरून उड्डाण घेत असताना हेलिकॉप्टर काटेरी टेकडी भागात क्रॅश झाले आणि आग लागली, असे अहवालात म्हटले आहे. सूत्रांनी सांगितले की, अपघाताच्या ठिकाणाहून चार मृतदेह सापडले आहेत, जे गंभीररित्या जळाले होते आणि त्यांची ओळख ताबडतोब निश्चित होऊ शकली नाही.