शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (14:37 IST)

MI-17 V5 अपघात, CDS जनरल रावत रुग्णालयात दाखल, गंभीर जखमी, अन्य 4 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली- तामिळनाडूतील कुन्नूरजवळ बुधवारी IAF MI-17 V5 हेलिकॉप्टर कोसळले. संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत हे देखील या हेलिकॉप्टरमध्ये होते. दरम्यान, जनरल रावत यांना रुग्णालयात नेण्यात आल्याचे वृत्त आहे.

जनरल रावत यांची प्रकृती कशी आहे, याचा खुलासा सध्या झालेला नाही. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
 
दरम्यान, या अपघाताची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली आहे. तीन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते 80 टक्के भाजले आहेत. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे हवाई दलाने म्हटले आहे.
 
सुलूर विमानतळावरून उड्डाण घेत असताना हेलिकॉप्टर काटेरी टेकडी भागात क्रॅश झाले आणि आग लागली, असे अहवालात म्हटले आहे. सूत्रांनी सांगितले की, अपघात स्थळावरून चार मृतदेह सापडले असून ते गंभीररित्या जळाले असून त्यांची ओळख पटू शकली नाही.