गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑक्टोबर 2024 (12:38 IST)

तिरुपती येथील इस्कॉन मंदिराला मिळाली बॉम्बस्फोटची धमकी

bomb threat
आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे बांधण्यात आलेल्या इस्कॉन मंदिराच्या प्रशासनाला बॉम्बस्फोटच्या धमकीचा संदेश आला आहे. आता हॉटेलांपाठोपाठ इस्कॉन मंदिरातही बॉम्बची धमकी मिळाली आहे. ज्याची माहिती मिळताच खळबळ उडाली आहे. पोलिस मंदिराच्या चारही बाजूंनी तैनात झाले.  
  
सध्या देशात बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळत आहे. दिल्लीतील शाळा, फ्लाइट,आंध्र प्रदेशातील तिरुपतीमधील हॉटेलांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आणि आता तिरुपतीच्या इस्कॉन मंदिराला बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार धमकी मिळताच पोलीस आणि मंदिर प्रशासनात घबराट पसरली. अग्निशमन दल, पोलीस पथके, बॉम्ब आणि श्वान पथकासह मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात झडती घेण्यात आली, परंतु मंदिर परिसरात कोणतीही स्फोटके सापडली नाहीत. आता मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली असून प्रत्येक व्यक्तीची कडक तपासणी केली जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार इस्कॉन मंदिराच्या कर्मचाऱ्यांना 27 ऑक्टोबर रोजी एक ईमेल मिळाला होता, ज्यामध्ये दावा केला की दहशतवादी मंदिर उडवून देतील. धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी पोहोचले. मंदिरात शोधमोहीम राबवण्यात आली, परंतु मंदिर परिसरातून कोणतीही स्फोटके किंवा इतर कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यानंतर पोलिसांनी ही धमकी खोटी असल्याचे सांगितलेआहे. ज्या ईमेल आयडीवरून धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहे.

Edited By- Dhanashri Naik