1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जुलै 2020 (21:52 IST)

प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी कर्नाटक सरकार ५ हजार रुपये देणार

The Karnataka government
झ्मा थेरेपीमुळे रुग्णांमधले कोरोनाचे विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे प्लाझ्मा थेरेपीचा देशभरात मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मात्र, यासाठी प्लाझ्मा डोनेट करणाऱ्यांची उणीव सध्या भासत आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या रक्तामधून प्लाझ्मा काढला जातो. मात्र, पुन्हा कोरोनाची लागण होण्याच्या भितीपोटी बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा डोनेच करण्यासाठी पुढे येत नसल्याचं चित्र आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी कर्नाटक सरकारने ५ हजार रुपये देण्याचं जाहीर केलं आहे. यातून प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी अधिकाधिक दाते पुढे येतील, अशी अपेक्षा कर्नाटक सरकारला आहे.
 
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात कोरोनाच्या विषाणूंचा सामना करू शकणाऱ्या अँटिबॉडी तयार झालेल्या असतात. त्यात प्लाझ्माच्या माध्यमातून कोरोनाची लागण झालेल्या दुसऱ्या रुग्णांच्या शरीरात सोडून त्यातून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्याचं अनेक केसेसमध्ये सिद्ध झालं आहे. मात्र, रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर २१ ते २८ दिवसांमध्ये त्याला प्लाझ्मा डोनेट करता येतो. १५ दिवसांतून एकदा प्लाझ्मा डोनेट करणं शक्य असतं. ४ महिन्यांपर्यंत एखादा रुग्ण प्लाझ्मा डोनेट करू शकतो.