ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या विद्यार्थिनीला वाचविण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील दुव्वाडा स्टेशनवर एक विद्यार्थिनी ट्रेनमधून उतरताना घसरून ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. समोर मृत्यू पाहून विद्यार्थिनी जोरजोरात रडू लागली. मात्र, सुदैवाने ट्रेन लगेचच थांबली आणि मुलीची यशस्वी सुटका झाली.
सायन्स कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यास करणारी मुलगी गुंटूरहून अण्णावरम येथील रायगडाकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनमध्ये चढली. दुव्वाडा स्टेशनवर ट्रेन थांबताच तिने चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करण्यात ती घसरली आणि ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली. मुलीने घाबरून आरडाओरडा केल्याने गोंधळ उडाला. ट्रेन लगेच थांबविण्यात आली.