रविवार, 8 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 20 नोव्हेंबर 2022 (11:10 IST)

'या 'शिधापत्रिकाधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत मिळणार, सरकारची घोषणा!

ration card rules
रेशन कार्डधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. तुम्हीही मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत उपयुक्त बातमी आहे. सरकारने एक मोठी घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत आता रेशन कार्डधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना सुरू केली आहे, आता रेशनकार्ड धारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत मिळणार. 
 
कोण असणार लाभार्थी -
सरकारने अयोध्या रेशनकार्ड धारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. तर सामान्य शिधापत्रिकाधारकांना फक्त 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ मिळणार आणि या साठी त्यांना 2 रुपये 1 किलो गहू साठी आणि 3 रुपये प्रतिकिलो तांदुळाची मोजावे लागणार आहे. 
 
 सरकार देशभरातील शिधापत्रिकाधारकांना अनेक सुविधा देत आहे, त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. यासोबतच कोरोनाच्या काळापासून सरकारने करोडो लोकांना मोफत रेशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लोकांना याचा लाभ मिळत आहे.
 
 शासनाच्या आदेशानुसार अंत्योदय कार्डधारकांना तेल आणि मिठाची पाकिटे देखील मोफत देणार आहे. या साठी प्रथम येणाऱ्यांना त्याचा फायदा मिळणार सांगण्यात आलं आहे. 
 
Edited By - Priya Dixit