सुप्रीम कोर्ट आज 'हा' महत्त्वाचा निर्णय सुनावणार
अंतिम वर्गाच्या परीक्षा घेण्याबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय आज होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता येणार निकाल येणार आहे. कोरोना महामारीमुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास महाराष्ट्र, दिल्ली आणि ओडिशाने कडाडून विरोध केला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग परीक्षा घेण्यावर ठाम असल्याने वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. परीक्षा घेण्यावरून थेट दोन गट पडल्याने राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचा निर्णय असणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष सुप्रीम कोर्टाकडे आहे.
कोरोना संकटामुळे विद्यापीठ परिक्षा लांबणीवर पडल्या आहेत. युजीसीने राज्यांना अंतिम वर्षांच्या परिक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्याविषयीचे दिशानिर्देश दिले आहेत. मात्र, महाराष्ट्रासह काही राज्यांनी परिक्षा घेण्यास असमर्थता दर्शविली असून युजीसीच्या दिशानिर्देशांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.