बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (10:59 IST)

ट्रेन पुढे उडी मारून तरुणाने जीव दिला, सुसाईड नोटमध्ये पंतप्रधान मोदी यांना ही विनवणी केली

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये, एक 16 वर्षीय तरुणाने एक चांगला डान्सर बनू शकला नाही या कारणास्तव  रेल्वेच्या समोर उडी मारून आत्महत्या केली, परंतु त्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोट सोडली, ज्यात त्याने पंतप्रधान मोदींना त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यास सांगितले आहे. या कथित सुसाईड नोटमध्ये या तरुणाने  पीएम मोदींना म्युझिक व्हिडिओ बनवण्यास सांगितले आहे. 
 
पोलिसांनी सोमवारी सांगितले की,तरुणाने आपल्या सुसाईड न मध्ये प्रख्यात  गायक अरिजीत सिंग यांना गाण्याचे आणि त्यांच्या गाण्यावर नेपाळी कलाकार सुशांत खत्री यांनी कोरिओग्राफी केलेल्या व्हिडिओ बनविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या तरुणाने पत्रात लिहिले आहे की हा म्युझिक व्हिडिओ त्याच्या आत्म्याला शांती देईल. किशोर यांनी पीएम मोदींकडे त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याची मागणी केली आहे. 
 
अकरावीचा हा विद्यार्थी ग्वाल्हेर शहरातील कॅन्सर हॉस्पिटल परिसरातील रहिवासी होता. झाशी रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी संजीव नारायण शर्मा यांनी सांगितले की, किशोरने रविवारी रात्री रेल्वे समोरउडी मारून आत्महत्या केली.
 
पोलिसांनी सांगितले की तरुणा कडून एक कथित सुसाईड नोट सापडली होती ज्यात त्याने लिहिले होते की तो एक चांगला डान्सर बनू शकत नाही कारण त्याचे कुटुंब आणि मित्र त्याला पाठिंबा देत नाहीत. तरुणाने असेही लिहिले आहे की, त्याच्या मृत्यूनंतर, एक म्युझिक व्हिडीओ बनवावा ज्यामध्ये अरिजीत सिंग हे गाणे गाईल आणि त्यात नेपाळी कलाकार सुशांत खत्री नृत्य करेल.  या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.