शनिवार, 1 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 6 डिसेंबर 2021 (19:47 IST)

साखरपुडा समारंभात थुंक लावून पोळ्या वाढत होता तरुण, मुलाने व्हिडीओ बनवला , आरोपीला अटक

The young man
मेरठमधील कंकरखेडा भागात आयोजित एका साखरपुडा समारंभात एक तरुण रोटीवर थुंकून समारंभासाठी आलेल्या लोकांना जेवण देत होता. एका मुलाने त्याचा व्हिडिओ बनवला. मुलाने हा व्हिडिओ कुटुंबीयांना दाखवल्यानंतर कुटुंबीयांनी आरोपीला बोलावून पोलिसांच्या ताब्यात दिले. 
याप्रकरणी कंकरखेडा पोलीस तपास करत आहेत. आरोपीला पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. सरधना रोडवर असलेल्या लक्ष्मी नगरमध्ये गुरुवारी साखरपुडा समारंभ पार पडला. समारंभात एका तरुणा वर असा आरोप आहे की आरोपी तंदूरवर पोळ्या बनवत होता. पोळ्या  बनवताना हा तरुण त्याच्यावर थुंकत होता, . दरम्यान, समारंभासाठी आलेल्या एका मुलाने त्याला असे करताना बघितले आणि त्याचा व्हिडिओ बनवला. 
 
या व्हिडिओबाबत मुलाने शुक्रवारी कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनी व्हिडिओ पाहून कंत्राटदाराला फोन करून आरोपीला बोलावण्यास सांगितले. आरोपी तरुण आणि कंत्राटदार दोघेही घटनास्थळी पोहोचल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी आरोपी तरुणाला पोलीस ठाण्यात नेले. कंकरखेडा पोलिस निरीक्षक सुबोध कुमार सक्सेना यांचे म्हणणे आहे की, तक्रार नोंदवली गेली आहे  आणि पुरावा ही मिळाला आहे. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल.