शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (10:45 IST)

ऑनलाईन गेमच्या व्यसनामुळे तरुणाने आत्महत्या केली

ऑनलाईन गेम चे व्यसन खूपच वाईट आहे. या गेम मुळे लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे.  अशी दुर्देवी घटना राजगड येथे घडली आहे. येथे ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या तरुणावर लाखोंचं कर्ज  होऊन हा कर्जबाजारी झाला होता. या मुळे त्रस्त होऊन त्याने टोकाचे पाऊल घेत ट्रेन समोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. हा तरुण विवाहित असून त्याला दोन मुलं आहे. 

राजगड येथील पडोनिया गावात राहणाऱ्या विनोद डांगी या तरुणाला ऑनलाईन च्या तीन पत्ती गेमचे व्यसन लागले होते. यामुळे तो लाखो रुपये हारला होता. त्याने उधारी उसनवारी करून ठेवली होती.  त्याच्या वडिलांची शेती होती. त्याची अनेक दुकाने आहे. त्याला तीन बहिणी असून तो एकुलता एक मुलगा होता. त्याला ऑनलाईन गेम खेळण्याचे एवढे व्यसन होते की तो दिवस भर खेळत राहायचा . त्याला त्याच्या कुटुंबीयांनी खेळायला नाही सांगितल्यावरून देखील त्याने गेम खेळणे सोडले नाही. या मुळे त्याने आपले 10 लाख रुपये गमावले. त्याने इतर लोकांकडून देखील पैसे उसने घेतले होते . त्यामुळे त्याच्यावर लाखोंचे कर्ज झाले. तो महिन्याभरापासून खूपच शांत होता. एके दिवशी तो एकाएकी घरातून गायब झाला. त्याच्या शोध घेतल्यावर त्याचे मृतदेह रेल्वे ट्रेक वर आढळले. घरातील सदस्यांनी त्याचा मृदेहाची ओळख पटवली आहे.