बुधवार, 22 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (09:09 IST)

पोटनिवडणुकीचा आज लागणार निकाल

The result of the by-election will be announced today पोटनिवडणुकीचा आज लागणार निकालMaharashtra News Regional Marathi News In Webdunia Marathi
लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या 29 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. 13 राज्य आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील जागांसाठी ही निवडणूक झाली.

लोकसभेच्या तीन जागा हिमाचल प्रदेशमधील मंडी, मध्य प्रदेशातील खांडवा आणि दादरा आणि नगर हवेली या आहेत. या तिन्ही ठिकाणी खासदारांच्या मृत्यूमुळं जागा रिक्त झाल्या होत्या.
 
तर विधानसभेच्या जागांचा विचार करता आसामध्ये पाच, पश्चिम बंगालमध्ये चार तर मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयात प्रत्येकी तीन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली मतदारसंघात पोटनिवडणूक झाली.