गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (19:45 IST)

दिवाळीच्या तोंडावर पंढरपूर हादरलं

पंढरपूरमधील वेळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे.
  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माळशिरस तालुक्यातील ही घटना घडली आहे. पीडित मुलगी आपल्या कुटुंबीयांसह उघडेवाडी गावात राहते. पीडित अल्पवयीन मुलगी सरकारी दवाखान्यात जात होती. त्यावेळी वाटेत तीन नराधमांनी तिला अडवले आणि तिची छेड काढली. त्यानंतर पीडितेला बाजूला घेऊन जाऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्यातार केल्याची बातमी समोर आली आहे. आरोपींना पकडण्यासाठी वेळापूर पोलिसांनी पथक तयार करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून पळून जाणाऱ्या संशयित आरोपींना इंदापूरमध्ये अटक केली.