बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (08:47 IST)

गडचिरोलीत राहुल गांधीना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी ठराव मंजूर

गडचिरोली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे राहुल गांधीना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी गडचिरोलीत काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात घेण्यात आला जाहीर ठराव. राज्याचे आपत्ती मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रदेश काँग्रेसतर्फे जाहीर ठराव मांडला. या ठरावाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनुमोदन केले. गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात घेण्यात आलेला हा ठराव दिल्लीला पक्षाकडे पाठवण्यात येणार आहे.
 
गडचिरोली येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती दर्शविली. दीर्घकाळानंतर ओबीसी कल्याण मंत्री मूळ गडचिरोलीकर असलेले विजय वडेट्टीवार व नाना पटोले यांची एकाच मंचावर उपस्थिती दिसली. पटोले यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड व्हावी अशी भावना व्यक्त केली. मेळाव्यात याच आशयाचा ठराव हात उंचावून मंजूर करण्यात आला. बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांचा राहुल यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याकडे कल असल्याचे मत त्यांनी मांडले. उत्साही काँग्रेस जनांमूळे आगामी काळात देशात काँग्रेस अव्वल स्थानी जाणार असल्याचा दावा पटोले यांनी केलाय.