सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मे 2021 (11:53 IST)

गडचिरोलीत चकमकीदरम्यान पोलिसांकडून १३ नक्षलवादी ठार, शोधमोहीम सुरू

गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १३ नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० युनिटकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
 
एटापल्लीमधील पेदी – कोटमी येथील जंगलात झालेल्या या चकमकीत पोलिसांनी १३ नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. जंगलात नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत असताना नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू असणाऱ्या ठिकाणी पोलिसांची तुकडी पोहचली. नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यावर प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीत १३ नक्षल ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. 
 
चकमक अजूनही सुरू असून शोधमोहीम देखील सुरु आहे.