मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (15:36 IST)

शाळकरी प्रेमी युगुलांनी नदीत उडी मारुन केली आत्महत्या

नववीतील मुलगी आणि अकरावीतील मुलगा असे टोकाचे पाऊल घेऊ शकतात अशी कल्पना देखील करवली जात नाही. अवघे 15 आणि 17 वर्षांच्या या अल्पवयीन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केली आहे. या प्रेमी युगुलांनी एकमेकांच्या हाताला दोरी बांधून नदीत उडी मारुन आत्महत्या केली.
 
मूळचे चंद्रपूरचे असलेल्या या दोघांनी गडचिरोलीतील एका पुलावरून वैनगंगेच्या नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावर या दोघांचे मृतदेह आढळले आहेत. मुलाचे वय वर्षे 17 आणि मुलीचे वय वर्ष 15 आहे. हे दोघे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात चिंचोली बुजुर्ग येथील रहिवासी होते.
 
दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघेही 3 ऑगस्टपासून बेपत्ता होते. दोघांच्या कुटुंबियांनी सगळीकडे शोधाशोध केली. मात्र त्यांचा पत्ता न लागल्यामुळे कुटुंबियांनी पोलिसांना कळवलं होतं. दोघेही चंद्रपुरातून गडचिरोलीपर्यंत जातील याचा अंदाजही बांधणे कठिण होते. ब्रह्मपुरी पोलिसानी गडचिरोली पोलिसांना ते दोघे बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. त्यांनी देखील दोघांचा तपास लावण्यास सुरुवात केली असताना त्यांना दोन मृतदेह शिवणी घाटावर आढळल्याची माहिती मिळाली पोलिसांनी चौकशी केल्यावर त्या अल्पवयीन प्रेमी युगुलांचे मृतदेह होते. एकमेकांच्या हाताला दोरी बांधलेली होती. प्रेमप्रकरणातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
 
दरम्यान, या प्रकाराने दोघांचे कुटुंबीय हादरुन गेले आहे. या आत्महत्येने परिसरात एकच खळबळ उडाली.