सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 मे 2021 (16:23 IST)

चंद्रपूरमध्ये कोविडनंतर म्युकरमायकोसिस आजार जडलेल्या १० रुग्णांची नोंद

चंद्रपूरमध्ये कोविडमधून बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य गंभीर आजार जडलेल्या १० रुग्णांची नोंद झाली. हे रुग्ण शहरातील विविध खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. 
 
कोविडमधून बरे झालेल्यांपैकी १० रुग्णांमध्ये डोळे व नाकात अनिष्ठ परिणामाच्या तक्रारी कुटुंबियांनी संबंधित डॉक्टरांकडे केल्या. नाकाभोवतीच्या मोकळ्या जागेत ही बुरशी जागा धरून राहाते. नाकातून सतत स्त्राव होणे, तीव्र डोकेदुखी व एखादी बाब दोनदा दिसून येणे, अशी लक्षणे आढळली. डॉक्टरांना ही माहिती दिल्यानंतर हा म्युकरमायकोसिस आजार असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी उपचारही सुरू केला आहे.